News Flash

“खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत”

अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईनंतर अतुल भातखळकरांचा आरोप

अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत (संग्रहित - PTI)

अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकत आज ईडीने कारवाई केली. त्यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा झपाटाच लावला आहे. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत असा आरोप करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. अशा आशयाचं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादी असल्याचंही म्हटलं आहे. ते म्हणतात, आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत.


सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याचं नाव आहे तर वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्याचं नाव आहे. त्यामुळे भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच आरोप केले आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे.

काय आहे प्रकरण, जाणून घ्या: अनिल देशमुखांच्या मुंबईतील घरावरही ईडीचा छापा; झाडाझडती सुरु

११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 12:34 pm

Web Title: atul bhalkhalkar tweeted about sharad pawar and uddhav thackeray on ed raid vsk 98
Next Stories
1 अनिल देशमुखांवरील ‘ईडी’च्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत संतापले; म्हणाले…
3 काही दिवसांनी अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी होणार – किरीट सोमय्या
Just Now!
X