राजापूरमधील बाबू अवसरे या शेतक ऱ्याच्या ५ डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल १ लाख ८ हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे!

कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. या व्यासपीठाद्वारे  कोकणातील १० आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटय़ांच्या लिलावाचा कार्यक्रम  मुंबईत आयोजित करण्यात आला. या प्रोत्साहनपर उपक्रमामध्ये ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरचे राजेश अथायडे यांनी १ लाख ८ हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली.