सातारा जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या औंध ग्रामपंचायतीची निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सर्व १५ जागा अविरोध झाल्याने ग्रामस्थांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. दरम्यान, कराड तालुक्यातील संजयनगर, लोहारवाडी व मेरवेवाडी तसेच पाटण तालुक्यातील डाकेवाडी, डिचोली या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पाटण तालुक्यातील चाफळ व विहे ग्रामपंचायतीसाठी चुरशीची लढत होऊ पाहात आहे.
औंध ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी ४२ अर्ज दाखल होते. यापैकी २७ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक- लक्ष्मी वॉर्ड क्रमांक १-आनंद सोपान रणदिवे, नंदिनी सुखदेव इंगळे, वैशाली विजय यादव. गणेश वॉर्ड क्रमांक २ – सचिन नंदकुमार शिंदे, भाग्यरेखा नारायणज्योत गोसावी, मालती रामचंद्र पवार. श्री यमाई वॉर्ड क्रमांक ३-राजेंद्र चंद्रकांत माने, हणमंत लक्ष्मण खरमोडे, सुरैया रहिमतुल्ला शेख. हनुमान वॉर्ड क्रमांक ४- दीपक अशोक देशमुख, मधुरा शंकर ढोणे, स्वाती आदिनाथ मेळावणे. ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक ५-रमेशबापू गोविंद जगदाळे, रोहिणी शंकर थोरात, बापूसाहेब गोविंद कुंभार या सदस्यांची अविरोध निवड झाली.