वेळेवर प्रचार खर्चाचा तपशील न कळविणाऱ्या २२ जणांना निवडणूक निरीक्षकांनी नोटिसा  बजावण्याचे आदेश दिले आहेत. काही उमेदवार दररोज निवडणूक खर्च दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. या खर्चाची तपासणी लवकरच केली जाणार आहे.
शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ५१० रुपयांचा खर्च केल्याचा तपशील दिला आहे. नितीन पाटील यांनी २ लाख ४६ हजार ३५८ तर आम आदमी पार्टीचे सुभाष लोमटे यांनी १ लाख ४१ हजार ५८० रुपये प्रचारावर खर्च झाल्याचे कळविले आहे. निवडणूक प्रचार कालावधीत दोन वेळा निवडणूक निरीक्षकांकडून खर्चाची तपासणी होते. १५ व १६ एप्रिल रोजी तपासणी केली जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर २२ उमेदवारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.