बनावट मुल्याकंन अहवाल सादर करत, जागेचे क्षेत्र वाढवून दाखवत गृहकर्जाच्या नावाखाली एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीला ३१ लाख ६५ हजार ८०३ रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलिसांना आरोपींपैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

सर्फराज सिराज सिद्दीकी (रा. समतानगर, चिंतामनी कॉलनी) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी आज पहाटे अटक केली. तर प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी त्याला रविवार(२१ मार्च) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीचे अधिकारी गणेश जयराम चौधरी (३२) यांनी फिर्याद दिली होती. नोव्हेबर २०१८ मध्ये आरोपी सर्फराज सिद्दीकी याने अदालत रोड येथील एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता.