News Flash

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात

गेल्या आठवड्यात औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध दर्शवला होता.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना एक वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए १९८१) मतीन यांच्यावर कारवाई केली आहे. मतीन यांची एका वर्षासाठी हर्सुल येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

बेकायदेशीर जमाव जमविणे, जाळपोळ करून नुकसान करणे, मनुष्यहानी होईल असे धोकादायक कृत्य करणे, जाणीवपूर्वक नुकसान पोहोचविणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, आदेशाचे उल्लंघन करणे, सरकारी कामात अडथळा असे विविध गुन्हे दाखल आहेत.

वाचा : औरंगाबाद: वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण 

शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध दर्शवला.  यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.   त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाचा – औरंगाबाद: भाजपा नेत्याची गाडी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली, चालकाला मारहाण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2018 11:52 am

Web Title: aurangabad aimim corporator who opposed resolution to pay vajpayee tribute sent to jail for a year
Next Stories
1 शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
2 औरंगाबाद ‘एमआयएम’मध्ये सुंदोपसुंदी!
3 इमानदार रिक्षाचालक, पोलिसांच्या मदतीने महिलेला परत केली ७० हजार रूपयांची बॅग
Just Now!
X