News Flash

“..तर मी जीव देऊन तुम्हाला अडचणीत आणेन”; रावसाहेब दानवेंना जावयाची धमकी

रावसाहेब दानवेंवर हर्षवर्धन जाधव यांचे गंभीर आरोप

भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्हीही जगा… पुन्हा जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेन आणि तुम्हाला अडचणीत आणीन अशी धमकी हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून दानवेंना हा इशारा दिला आहे. या व्हिडिओत हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली असून दानवेंमुळेच माझी ही अवस्था झाल्याचा आरोप केला आहे.

गेल्या आठवड्यात हर्षवर्धन जाधव यांनी राजकरणातून संन्यास घेतल्यानंतर ते राज्यात चर्चेचा विषय होते. त्यानंतर आठवडाभरात यूट्युबवर व्हिडिओ अपलोड केला असून सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात गेल्या बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत.

व्हिडिओत हर्षवर्धन जाधव यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणालेत की, ‘तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू. पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि अनेक वरिष्ठ वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, इतकं लक्षात ठेवा’, असा धमकीवजा इशाराच हर्षवर्धन जाधव यांनी दिला असून या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 8:50 am

Web Title: aurangabad harshwardhan jadhav critrics on rao saheb danve update nck 90
Next Stories
1 धक्कादायक! सोलापुरातील कारागृहात ३४ कैद्यांना करोनाची लागण
2 सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी ७ करोनाबाधित
3 जळगावमध्ये करोनाचे २४ नवीन रुग्ण
Just Now!
X