21 September 2020

News Flash

औरंगाबादमध्ये महायुतीला बहुमताची हुलकावणी, एमआयएमची मुसंडी

शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील लढाईमुळे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक प्रचंड लक्षवेधी ठरली होती.

| April 23, 2015 10:06 am

अत्यंत चुरशीच्या झालेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत एकीकडे बंडखोरीमुळे युती करूनही शिवसेना भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. तर दुसरीकडे एमआयएमने अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकत या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली. औरंगाबादमध्ये युतीची सत्ता येणार हे जरी निश्चित असले तरी त्यासाठी त्यांना आता बंडखोरांची आणि अपक्षांची गरज पडणार आहे, हे देखील स्पष्ट आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या गुलमंडी वॉर्डातून त्यांचे उमेदवार आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. महायुतीला ५१ जागांवर यश मिळाले असून, एमआयएमला स्वबळावर २५ जागा जिंकण्यात यश मिळाले आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या ११३ प्रभांगासाठी बुधवारी ६२ टक्के मतदान झाले होते. प्रचाराच्या केंद्रस्थानी धार्मिक मुद्दे राहिलेली औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील लढाईमुळे प्रचंड लक्षवेधी ठरली होती. निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेच्या दोन माजी महापौर कला ओझा आणि अनिता घोडेले यांना पराभवाचा झटका सहन करावा लागला आहे.
मुस्लिमबहुल भागांमध्ये एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचबरोबर एमआयएमने उमेदवारी दिलेले पाच दलित उमेदवारही निवडणुकीत यशस्वी ठरले आहेत.
अंतिम पक्षीय बलाबल
शिवसेना – २९
भाजप – २२
एमआयएम – २५
कॉंग्रेस – १०
राष्ट्रवादी – ३
बसप – ५
रिपब्लिकन पक्ष – १
अपक्ष – १८

* प्रभाग क्र. ८७ – मनोज गांगवे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ८९ – ज्योती नाडे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ९० – आशा भालेराव (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ६९ – अंजली भागवत कराड (भाजप) विजयी
* प्रभाग क्र. ७५ – त्रंबक तुपे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ९१ – मनिषा मुंडे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ९४ – आत्माराम पवार (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ९५ – ज्योती मोरे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्र. ९६ – विमल केंद्रे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ९८ – दिलिप थोरात (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ९९ – अर्चना नीलकंठ (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ११२ – रांजेंद्र जंजाळ (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ३८ – राजू शिंदे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ३६ – सुरेखा सानप (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्र. ३४ – संगीता वाघुले (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. ५६ – मल्लिका बेगम कुरेशी (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्र. ८२ – भाऊसाहेब जगताप (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्र. ३९ – सुरेखा खरात (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ९६ – मीणा गायके (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ५७ – समीना शेख (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. १०६ – विमल कांबळे (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्र. ४३ – अजिम अहमद रफीक (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्र. ८६ – भगवान घडमोडे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ७९ – गजानन मनगटे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. १०९ – शोभा बुरांडे (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्र. ४२ – नसीम बी खांदू (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. ४४ – साजेदा फारूखी साईद फाऱूखी (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. ६५ – राखी देसरडा (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ७१ – सरिता बोर्डे (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. ७३ – विजय बनकर (बसपा) विजयी
* प्रभाग क्र. ७६ – अंकिता विधाते (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्र. ७७ – जयश्री कुलकर्णी (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ६२ – शीतल गादगे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ६३ – अब्दुल नाईकवाडी (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. ६४ – शिवाजी दांडगे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. 70 – गजानन बारवाल (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ४५ – खतीजा कुरैशी,अपक्ष विजयी
* प्रभाग क्र. ४६ – फिरोज खान, एमआयएम विजयी
* प्रभाग क्र. ४७ – यशश्री बखरिया (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्र. ४८ – राजू तनवाणी,भाजपा बंडखोर, विजयी
* प्रभाग क्र. ५५ – मनोज बल्लाळ (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ५८ – आसमा पठाण (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. ५९ – रमेश आजभये (रिपाई डेमोक्रेटिक) विजयी
* प्रभाग क्र. १ – पूनम बामणे,भाजपा विजयी
* प्रभाग क्र. २ – बन्सी जाधव, शिवसेना विजयी
* प्रभाग क्र. ३ – रूपचंद वाघमारे, अपक्ष विजयी
* प्रभाग क्र. ४ – ज्योती अभंग, अपक्ष विजयी
* प्रभाग क्र. ५ – राज वानखेडे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ६ – पुष्पा रोजातकर (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ८ – सीताराम सुरे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. ९ – स्वाती नागरे (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्र. १० – अनिता साळवी (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्र. १६ – मनिषा लोखंडे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. १८ – अफसर खान (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्र. २४ – सरवत हुसैन सय्यद (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. २९ – शोभा वळसे (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ३० – नितिन चित्ते (भाजपा) विजयी
* प्रभाग क्र. ३१ – ज्योती पिंजरकर (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्र. १०१ – लता निकाळजे (एमआयएम) विजयी
* प्रभाग क्र. १०३ – विकास जैन (शिवसेना)
* प्रभाग क्र. १०५ – अब्दुल नविद अब्दुल राशिद (काँग्रेस)
* प्रभाग क्र. १०७ – कुणालकुमार घोडेले (शिवसेना)
* प्रभाग क्र. १०८ – मुल्ला सलीम बेगम (राष्ट्रवादी)
* प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसच्या अनिता साळवी
* प्रभाग क्रमांक ९२ मधून भाजपचे प्रमोद राठोड
* प्रभाग क्रमांक ४१ मधून  एमआयएमचे इरशाद इब्राहिम
* प्रभाग क्रमांक ५५ मधून शिवसेनेचे सिद्धार्थ शिरसाठ 
* प्रभाग क्रमांक ७४ मधून शिवसेनेचे नितीन साळवी विजयी
* प्रभाग क्रमांक ४० मधून शिवसेनेचे मकरंद कुलकर्णी विजयी
* प्रभाग क्रमांक ६८ मधून शिवसेनेचे ऋषिकेश खैरे
* प्रभाग क्रमांक ३५ मधून अपक्ष गोकुलसिंग संपतसिंग- मलके विजयी
* प्रभाग क्रमांक १०३ मधून शिवसेनेचे विकास जैन विजयी
* प्रभाग क्रमांक १०० मधून शिवसेनेच्या सुमित्रा हारनोर विजयी
* प्रभाग क्रमांक ३३ मधून काँग्रेसच्या शबनम कुरेशी विजयी
* प्रभाग क्रमांक १०७ शिवसेनेचे कुणालकुमार घोडेले विजयी
* औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा बिनविरोध विजय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 10:06 am

Web Title: aurangabad mahanagar palika election result 2015
टॅग Bjp,Mim
Next Stories
1 ‘गोकुळ’साठी आज मतदान
2 डीएड प्रश्नपत्रिकेस उशीर; विद्यार्थ्यांची गैरसोय
3 कुकडी कारखान्यात जगताप यांची हॅटट्रिक
Just Now!
X