औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांच्याविरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे औरंगाबादेत खळबळ उडाली असून मतीन हे आपल्या वादग्रस्त विधाने आणि वागण्यामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवत नगरसेवक सय्यद मतीन यांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार रशीदपुरा येथील एका महिलेनी केली आहे. याची दखल घेत औरंगाबादच्या सिटीचौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१५) रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात वंदे मातरम सुरु झाल्यानंतर खुर्चीवरच बसून राहणे, त्याचबरोबर माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध केल्यामुळे एमआयएम पक्षाने त्याच्यावर निलंबनची कारवाईही केली होती.