याचिकाकर्त्यांच्यावतीने युक्तिवाद पूर्ण

औरंगाबाद : दीडशे कोटी रुपयांतून शहरातील रस्ते तयार करण्यासाठीच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असून याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिका आता १४ ऑगस्ट रोजी बाजू मांडणार आहे. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

दीडशे कोटी रूपयांच्या रस्त्यांची निविदा प्रक्रिया महापालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आली होती. ६० घनफूट मीटर प्रतीतास क्षमता असलेल्या प्रकल्पाची अट निविदेत टाकण्यात आली होती. संबंधित अट अनावश्यक असल्याने स्पर्धा कमी होत असल्याने त्यास खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने अट शिथिल केली व त्यामुळे निविदेस चांगला प्रतिसाद मिळाला. दीडशे कोटींच्या कामाचे सहा भाग महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. सहा कामे एकाच कंत्राटदार कंपनीस देण्यात आली. याला खंडपीठात आव्हान दिल्यानंतर नव्याने प्रक्रिया करण्याचे महापालिकेने जाहीर केले. नवीन प्रक्रियेत सर्व कंत्राटदारांना भाग घेता येईल असेही मनपाच्या वतीने सूचित करण्यात आले होते. नवीन निविदा काढली. चíनया कन्स्ट्रक्शन व वंडर सुप्रिम यांनी स्वतंत्ररीत्या जॉईंट व्हेंचरमध्ये निविदा सादर केली होती. महापालिकेने व्यावसायिकरीत्या संयुक्त विद्यमाने नाकारल्यामुळे त्यात अनेकांना भाग घेता आला नाही. याविरोधात दोन्ही संस्थांनी खंडपीठात याचिका दाखल करून व्यावसायिकरीत्या संयुक्त विद्यमाने निविदा सादर करण्यास परवानगी द्यावी, महापालिकेच्या हिताची बाब नाही. स्पर्धा कमी होते त्यामुळे भाग घेऊ द्यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. पूर्वी अशा प्रकारे निविदा भरण्यास मनपाने परवानगी दिली होती. प्रथम सुनावणीत नोटीस काढल्यानंतर महापालिकेच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आले होते. बुधवारी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. महापालिकेच्या वतीने १४ ऑगस्टला युक्तिवाद करण्यात येईल. मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख काम पाहत असून त्यांना अ‍ॅड. गोिवद कुलकर्णी, अ‍ॅड. आनंद कुलकर्णी, अ‍ॅड. कुणाल काळे, अ‍ॅड. अश्विनी सहस्रबुद्धे, अ‍ॅड. निर्मल दायमा साहाय्य करीत आहेत.