20 September 2018

News Flash

लग्नासाठी दबाव टाकल्याने पोलिसाची आत्महत्या

अनिलने मुलीच्या घरच्यांना व स्वतःच्या आईला लग्न न करण्याचे सांगितले होते.

शहर पोलीस दलातील चार्ली पथकात २५ वर्षीय अनिल अशोक घुले हा कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता

औरंगाबादमधील पोलीस दलाच्या चार्ली पथकात असलेल्या अनिल अशोक घुले याने आत्महत्या केल्याची घटना घडली. मुलीच्या घरच्यांनी लग्नास जबरदस्ती केल्याने अनिल घुलेने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांची तक्रार असल्यास या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.

HOT DEALS
  • Sony Xperia XA1 Dual 32 GB (White)
    ₹ 17895 MRP ₹ 20990 -15%
    ₹1790 Cashback
  • Coolpad Cool C1 C103 64 GB (Gold)
    ₹ 11290 MRP ₹ 15999 -29%
    ₹1129 Cashback

शहर पोलीस दलातील चार्ली पथकात २५ वर्षीय अनिल अशोक घुले हा कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. अनिलचे भोकरदनमधील मुलीशी लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. येत्या १ एप्रिल रोजी त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतू, अनिलचे आणि त्या मुलीचे काही कारणास्तव बिनसले होते. यानंतर अनिलने मुलीच्या घरच्यांना व स्वतःच्या आईला लग्न न करण्याचे सांगितले होते.

मात्र, मुलीच्या घरच्यांनी अनिलच्या निर्णयाला विरोध करत साखरपुड्याचा खर्च म्हणून २५ लाख रुपये देण्याची मागणी केली. यामुळे अनिल तणावात होता. त्याच तणावात सोमवारी गाडीतील पेट्रोल काढून स्वतःच्या अंगावर टाकत पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

First Published on March 13, 2018 2:54 pm

Web Title: aurangabad police committed suicide over marriage issue