करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. एकीकडे लॉकडाउने निर्बंध हळूहळू शिथील होत असताना, दुसरीकडे मात्र करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमधील रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत आहे.औरंगाबाद जिल्ह्या आज सकाळी ११४ नव्या करोनाबाधितांची नोंद झालेली होती. त्यात दुपारी आणखी सात रुग्णांची भर पडून नव्या करोनाबाधितांची आज दुपारपर्यंतची संख्या १२१ पर्यंत पोहचली आहे.

तर, औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील  कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार २७१ झाली आहे. यापैकी १ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ११६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, सद्यस्थितीस ८७२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. तसेच, आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ४१ महिला व ८० पुरुषांचा समावेश आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. गल्ली नं.3 कैलास नगर (1), रोशन गेट (1), गल्ली नं.2 पुंडलिक नगर (1) खोकडपुरा (1), जय हिंद नगर, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर एन 2, सिडको (1), सिल्क मिल कॉलनी (1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा परिसर (1) ,कैलास नगर (2), कटकट गेट (1), संसार नगर (1), बारी कॉलनी (2),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (1), औरंगपुरा (1),सिडको एन सात (2),अरिहंत नगर (1), न्याय नगर, गारखेडा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), गजानन नगर, गारखेडा (1), भानुदास नगर (1), गारखेडा परिसर (5), सारंग सोसायटी (2), सहयोग नगर (2),सिटी चौक (1), खोकडपुरा (1), फाहेत नगर, राहत कॉर्नर (3), हर्ष नगर (2), बाबर कॉलनी (1), टिळक नगर (2), शहा बाजार (1), पडेगाव (3), शिवाजी नगर (1), बेगमपुरा (2), बजाज नगर,सिडको (1), जुना बाजार (1), मुलमची बाजार,सिटी चौक (2), मयूर नगर, एन अकरा (3), एन आठ (2), आकाशवाणी परिसर (1), मसोबा नगर (1), एन अकरा (1), एन चार,सिडको (1), विशाल नगर (1), आदिनाथ नगर, गारखेडा (2), जाधववाडी (1), टी. व्ही. सेंटर (1), आरटीओ ऑफिस परिसर (1),चित्रेश्वर नगर (1), बीड बायपास (1), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (2), रोकडिया हनुमान परिसर (1), मस्के पेट्रोलपंपाजवळ (1), प्रताप नगर,सिडको (1), एन सहा, साई नगर,सिडको (1), बंजारा कॉलनी (1), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (1), ज्योती नगर, दर्गा रोड (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (1), सावरखेडा, ता. सोयगाव (2), कन्नड (1), सिता नगर, बजाज नगर (5), बजाज नगर परिसर (11), सिडको वाळूज महानगर एक (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गणेश नगर, पंढरपूर (2), अन्य (16) या भागातील कोरानाबाधित आहेत.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद हे संवेदनशील शहर म्हणून समोर आलं आहे. तरी करोनाची परिस्थिती व उपाययोजना पुरेशा आहेत का?, रूग्णालय उपलब्ध आहेत का?, रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन मनुष्यबळ आहे का? याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी औरंगाबादचे जिल्हाधिकारी, आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सविस्तर बैठक घेऊन चर्चा केली आहे.