औरंगाबाद येथील एका उद्योजकाचा मृतदेह दौलताबाद येथील मोम्बत्ता तलावात आढळून आला. नितीन अग्रवाल असे या उद्योजकाचे नाव असून ही आत्महत्या की घातपात आहे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मृत नितीन अग्रवाल यांचा पैठण येथे भागीदारीत एक उद्योग आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीन हे मानसिक तणावाखाली होते, असे त्यांच्या काही मित्रांनी सांगितले. परंतु, त्यांच्या मृत्यूचे कारण आणखी समजू शकलेले नाही. तलावाच्या बाजूला कार व चावी सापडली. त्याच्यावरून नितीन यांची ओळख पटली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.