News Flash

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील २८ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

शेषाद्री गौडा असं या डॉक्टरचं नाव आहे

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात एका २८ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली आहे. डॉ. शेषाद्री गौडा असं या २८ वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. मानसिक आजार असल्याच्या संशयातून त्यांनी इंजेक्शन घेऊन त्यांचं आयुष्य संपवलं आहे. डॉ. शेषाद्री गौडा हे गोल्ड मेडलिस्ट होते. त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेषाद्री गौडा हे या विभागातले निष्णात डॉक्टर म्हणून परिचित होते. दरम्यान या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया ते करत आहेत. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते आहे.

डॉक्टर गौडा यांनी विषारी रसायन इंजेक्शनद्वारे टोचून घेतलं. गौडा हे बेगमपुरा भागात वास्तव्यास होते. मनोविकार जडल्याच्या संशयातून त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. गौडा यांची सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र या सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं आहे ते स्पष्ट केलेलं नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 5:18 pm

Web Title: aurgnabad ghati hospital doctor suicide at home scj 81
Next Stories
1 जालना जि.प. निवडणुकीतून भाजपाची माघार; महाविकासआघाडीचा सत्ता
2 ‘ठाकरे’ आडनाव नसतं तर राज संगीतकार झाले असते; गुलाबराव पाटलांची सडकून टीका
3 नरखेडमध्ये सापडलेला सांगाडा सातवाहन कालीन?
Just Now!
X