23 February 2020

News Flash

रिक्षाचालक तरुणाची हत्या

गाडीला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून शिर्डीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाचालक तरुणाची हत्या करण्यात आली. 

संग्रहित छायाचित्र

राहाता : गाडीला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून शिर्डीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाचालक तरुणाची हत्या करण्यात आली.  याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात खून व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

विठ्ठल साहेबराव मोरे (वय ३५ वर्षे रा. भिमनगर,शिर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे  यांनी माहिती देताना सांगितले,की शिर्डीत पिंपळवाडी रस्त्यावर सय्यद बाबा दर्गासमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठल साहेबराव मोरे (वय ३६ वर्षे रा.भिमनगर,शिर्डी) हा तरुण अपेरिक्षा (एम. एच. १७ ए. ए. ६७४)  घेऊन पिंपळवाडी रस्त्याने घराकडे जात असताना आरोपी श्रीकांत शिंदे (वय ३० रा, कालीकानगर शिर्डी ) हा त्याच्या  मोटारीतून  (एम.एच.२७ बी.के.११००) या रस्त्यावरुन जात असताना रस्त्यात रिक्षा उभी असल्याने शिंदे यांची गाडी जाण्यास रस्ता नव्हता. या वेळी रिक्षाचालक मोरे व श्रीकांत या दोघांत गाडी ओव्हरटेक करण्यावरुन वाद झाला. या वादातूनच विठ्ठल साहेबराव मोरे या रिक्षा चालक तरुणाचा खून झाला.

कृष्णा रमेश शेजवळ (रा.शिर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी आरोपी श्रीकांत  शिंदे याच्या विरूद्ध खून व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

First Published on February 15, 2020 1:20 am

Web Title: auto driver murder akp 94
Next Stories
1 अपघातात दोन जण ठार; दोघे गंभीर जखमी
2 महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
3 शिकारीमुळे खवले माजरांची ८० टक्के संख्या कमी
Just Now!
X