* देशात एक हजार बालकांमागे पाच कर्णबधिर * जागतिक कर्णबधिर दिन विशेष

देशात कर्णबधिर आणि मूकबधिर असे दुहेरी अपंगत्व आलेल्या दिव्यांगांची संख्या मोठी आहे. देशात एक हजार बालकांमागे पाच जन्मजात कर्णबधिर असल्याचे प्रमाण सर्वेक्षणातून समोर आले. जन्मजात कर्णबधिरत्व असल्यास मूकबधिरत्व येतेच. त्यामुळे नवजात बालकांची श्रवण चाचणी केल्यास हे दुहेरी अपंगत्व टाळणे सहज शक्य असल्याचे मत अकोल्यातील कर्णबधिर बालविकास केंद्राच्या संचालिका सुचिता बनसोड यांनी व्यक्त केले. या महत्त्वाच्या चाचणीकडे मात्र शासनाकडूनच दुर्लक्ष होत असल्याने ही दुहेरी अपंगत्वाची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे अधोरेखित होते.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Women MP in parliement
Loksabha Election : महिला उमेदवारांची संख्या वाढतेय; पण जिंकणाऱ्यांचं प्रमाण का घटतंय? १९५७ पासूनची आकडेवारी काय सांगते?
Loksatta vasturang Exemption in stamp duty and fine
मुद्रांक शुल्क व दंडात सवलत

श्रवणरहास ही गंभीर स्वरुपाची शारीरिक कमतरता असली, तरी त्वरित व योग्य उपचार आणि विशेष प्रशिक्षण-सुविधा मिळाल्यास कर्णबधिरांनाही सर्वसामान्य स्वावलंबी जगणे सहज शक्य आहे. मात्र, जनजागृतीच्या अभावी बालकांमधील कर्णबधिरत्वाचे निदान होण्यासच उशीर होतो. मुल कर्णबधिर असल्याचे कळल्यावर कोलमडणाऱ्या कुटुंबीयांना वेळेत मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळत नाही. यावर वैद्यकीय उपचार सहजपणे उपलब्ध होत नाही व ते खíचक स्वरूपाचे असतात. या सर्व अडथळ्यांच्या शर्यतीत कर्णबधिर मुलांची वाचिक क्षमता, घडण्याचे वय निघून जाते. जगण्यासाठी पायाभूत ठरणाऱ्या भाषिक-वाचिक क्षमतेच्या अभाव निर्माण होतो. कर्णबधिरत्व हे जन्मजात आढळून येते. बालकांमध्ये श्रवण क्षमता नसल्याने कालांतराने त्यांच्यात मूकबधिरत्व येते. त्यामुळे त्या मुलाला दुहेरी अपंगत्वाला सामोरे जावे लागते. प्रत्येक नवजात बालकाची श्रवण चाचणी केल्यास या समस्यावर आळा बसणे सहज शक्य आहे. बालकाच्या जन्मापासून श्रावणाच्या तीन चाचण्या केल्यास त्याचे निदान होऊ शकते. त्यामुळे वेळीच उपचार व थेरपी करून त्या मुलाला मूकबधिरत्व होण्यापासून वाचवता येऊ शकते.

नवजात बालकाची ओएई ही प्राथमिक चाचणी करणे गरजेची आहे. याद्वारे बाळ श्रवण करू शकते की नाही हे तपासले जाते. ही तपासणी लहान बाळांसाठी उपयुक्त ठरते. या तपासणीत काही आढळून आल्यास बेरा (बीईआरए) ही दुसरे चाचणी करणे गरजेचे ठरते.

त्यानंतर पीटीए हे चाचणी करून त्या मुलाला अवघ्या सहा महिन्यांपासून श्रवण यंत्र लावता येणे शक्य आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणारा मुकबधिरत्व टाळणे शक्य होऊ शकते. मात्र, या संदर्भात राज्यात जनजागृतीचा नाही.

आरोग्य खात्याने श्रावणाच्या या चाचण्या मोफत व सक्तीच्या केल्यास देशातील या दुहेरी अपंगत्वाचे प्रमाण बहुतांश कमी होईल, असा विश्वासही बनसोड यांनी व्यक्त केला.

अकोल्यात कर्णबधिरांचे ‘बोलके केंद्र’

कर्णबधिरांच्या दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्नांकडे आणि त्यांच्या सक्षमीकारणासाठी अकोल्यात  सुचिता आणि श्रीकांत बनसोड या दाम्पत्याने एकविरा बहुउद्देशीय संस्थेद्वारे बालविकास केंद्राची उभारणी केली आहे. कर्णबधिर बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालपणापासूनच श्रवण, वाचा, भाषा, प्रशिक्षणासह त्यांच्या शैक्षणिक आणि सर्वागीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे केंद्र  कार्यरत आहे. शासनाची कोणतीही मदत न घेता बनसोड दाम्पत्य हे कार्य करीत असून या केंद्राच्या माध्यमातून असंख्य कर्णबधिर बालक ‘बोलके’ झाले आहेत.