News Flash

समाजप्रबोधन संस्थेचे पुरस्कार जाहीर

शहरातील समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘प्रबोधन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पंचवटी कारंजाजवळील

| January 11, 2013 06:06 am

शहरातील समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘प्रबोधन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पंचवटी कारंजाजवळील पलुस्कर सभागृहात हा पुरस्कार सोहळा उपमहापौर सतीश कुलकर्णी, नगरसेविका शालिनी पवार व अरुण पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संस्थेचे जिल्हाध्यक्ष विवेक देशपांडे यांनी दिली.  समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करीत असलेल्या १३ मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये समाज कार्यासाठी राजेंद्र शिंदे, परभणी येथील जगन्नाथ शेजवळ, सांस्कृतिक कार्यासाठी ज्ञानदेव भालके, कृषीसाठी सुरेश जगताप, संगणक व तंत्रज्ञानासाठी परिमल मुजुमदार, शैक्षणिकसाठी मनोज ढिकले, दत्तात्रय कस्तुरे, सोलापूर येथील सुरेखा महादसवाड, कामगार क्षेत्रासाठी शरद महाले, शोध पत्रकारितेसाठी रत्नदीप सिसोदिया, अध्यात्मासाठी पुणे येथील डॉ. अरविंद भागवतबाबा, चित्रकलेसाठी आनंद सोनार, शाहिरीसाठी आनंद मुळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे राज्य अध्यक्ष गिरीश पाटील, उपाध्यक्ष अरुण संधानशिव यांनी केले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 6:06 am

Web Title: awards of samajprabodhan had announce
टॅग : Nashik
Next Stories
1 नाशकात सिद्ध समाधी योग वर्ग
2 ‘आदित्य डेंटल’च्या विद्यार्थिनींचे आंदोलन
3 एसटी कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा प्रवाशांच्या मुळावर!
Just Now!
X