26 January 2021

News Flash

तरुणांच्या जागरूकतेमुळे मांडुळाची तस्करी रोखली

रानवस्तीवरील एका घरात साप शिरला असल्याची माहिती काही तरुणांना मिळाली

वड्डी (ता. मिरज) येथे वस्तीवर पकडण्यात आलेला मांडूळ सर्प.

सांगली : अंधश्रध्देपोटी मांडूळ सर्पांची होणारी तस्करी काही तरुणांच्या जागरूकतेने वाचली. अ‍ॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी वेळीच दक्षता घेत हा सर्प वनविभागाच्या ताब्यात देत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची घटना मिरज तालुक्यात वड्डी येथे गुरूवारी घडली.

याबाबत माहिती अशी की, रानवस्तीवरील एका घरात साप शिरला असल्याची माहिती काही तरुणांना मिळाली. हा सर्प ग्रामीण भागात दुतोंडी म्हणून ओळखला  जातो. याचा वापर अंधश्रध्देतून पशाचा पाऊस पाडण्यासाठी केला जात असल्याची अफवा असून यासाठी  लाखो रूपये मोजण्याची तयारी काही मंडळी करीत असतात. यामुळे काही तरुण हा साप ताब्यात घेण्यासाठी पुढे आले हेते. मात्र अंकुश गालफाडे, निलेश गालफाडे, सतीश नाईक, रणजित बस्तवडे आदींनी या सापाला पकडून अ‍ॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिली.

अ‍ॅनिमल राहतचे दिलीप शिंगाणा, किरण नाईक, प्रसाद सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन या सापाबाबत असलेल्या अंधश्रध्देबाबत प्रबोधन करीत वनपाल साळुंखे यांच्या मदतीने हा मांडूळ जातीचा साप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 12:01 am

Web Title: awareness of youth prevented trafficking of two mouthed mandul snake zws 70
Next Stories
1 वांद्रे गर्दी प्रकरण : अटकेत असलेल्या विनय दुबेच्या भावाची पोलीस संरक्षणाची मागणी
2 रेशनची दुकानं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार; छगन भुजबळ यांचे आदेश
3 Coronavirus : मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले 245 कोटी रुपये
Just Now!
X