21 September 2020

News Flash

माझ्यामुळे दानवेंना लाभ, तर इतरांना पोटशूळ का?

बदल्याची भावना आपल्या मनात नाही. परंतु तरीही लोक बोलत असतात.

रामदेवबाबा ( संग्रहीत छायाचित्र )

रामदेव बाबा यांचा पत्रकार परिषदेत प्रतिसवाल

माझ्या आगमनामुळे खासदार रावसाहेब दानवे यांना लाभ होत असेल तर त्यामध्ये इतरांना पोटशूळ होण्यासारखे काय आहे, असा प्रतिप्रश्न योगगुरू रामदेव बाबा यांनी जालना येथे पत्रकारांना केला. यावेळी दानवे यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले होते. २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान खासदार दानवे यांनी आयोजित केलेल्या योग शिबिरानिमित्त गुरुवारी दुपारी रामदेव बाबा यांचे जालना शहरात आगमन झाले. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.

जालना येथे तीन दिवस पहाटे ५ ते ७.३० दरम्यान योग शिबिर आणि २५ फेब्रुवारी रोजी दुपारी महिलांसाठी विशेष योग शिबिर तसेच २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भोकरदन येथे शेतकरी मेळाव्यास रामदेव बाबा उपस्थित राहणार आहेत. खासदार दानवे या शिबिराचे आयोजक असून गेले अनेक दिवस ते यासाठी पूर्वतयारी करीत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपण गेल्यामुळे ते पंतप्रधान झाले. आता आपण रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी असल्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील काय, असा प्रश्न रामदेव बाबा यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, आपण जालना येथे कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाही. परंतु खासदार दानवे यांनी योग शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे आपल्या आगमनामुळे त्यांना काही फायदा होणार असेल तर त्यामुळे इतरांना  त्रासदायक काय आहे?

लोक म्हणतात, आपली आणि भाजपची जवळीक आहे. परंतु सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव नाही. आपण राहुल, प्रियंका त्याचप्रमाणे मनमोहन सिंग यांना भेटलो आहोत. बदल्याची भावना आपल्या मनात नाही. परंतु तरीही लोक बोलत असतात. आपण स्वभावाने राजकारणी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात योगाचे महत्त्व सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिन त्यांच्यामुळे सुरू झाला. आपणही एकदा त्यांना मदत केली होती. त्याबद्दल त्यांनीही योग दिनाची मदत केली.

दलित, मुस्लिम त्याचप्रमाणे िहदूंमधील विशिष्ट जाती आपले संघटन करीत असतील तर मी त्यास देशहिताच्या दृष्टीने अनुकूल मानत नाही. बांगला देशातील नागरिकांची घुसखोरी त्याचप्रमाणे रोिहग्या मुस्लिमांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. शिक्षण, आरोग्य सेवा  सर्वासाठी समान असली पाहिजे. बाहेरच्या देशातून काळे धन फार कमी प्रमाणावर आणता आले आहे. ते काम कठीण असले तरी सरकार त्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागपूर येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्पानंतर येत्या दिवाळीत नेवासा येथे दूध प्रकल्प सुरू करण्याचा पतंजलीचा प्रयत्न आहे. पतंजलीच्या माध्यमातून एक लाख लोकांना आतापर्यंत रोजगार मिळाला असून एक कोटी शेतकरी जोडले गेले आहेत. आपण शेतकऱ्याचे पुत्र आहोत. परंतु फोटोसेशन करण्यासाठी मात्र शेतकऱ्याच्या झोपडीत जात नाही, असेही ते म्हणाले.

मी बोललो तर वादंग उठेल!

राज ठाकरे यांनी अलीकडेच घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आरक्षण आर्थिक निकषावर असण्याच्या संदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदेव बाबा म्हणाले, हा विषय म्हणजे अशी आग आहे की त्यामुळे हात जळतील! या संदर्भात माझे काही विचार आहेत, परंतु मी जर बोललो तर वादंग निर्माण होऊ शकते. पतंजलीच्या बिस्किटमध्ये मदा आढळल्याच्या संदर्भात राजस्थानमध्ये गुन्हा नोंदविला असल्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता रामदेव बाबा म्हणाले, तसे काहीही नाही. कुणाला तरी पैसे हवे होते म्हणून या संदर्भात तक्रार झालेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 5:16 am

Web Title: baba ramdev to attend yoga camp organised by mp raosaheb danve
Next Stories
1 पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे आव्हान स्वीकारले
2 जिद्द, परिश्रम हे सुदर्शनच्या यशाचे गमक
3 अनास्थेने पंचगंगा मृतवत होण्याचा धोका
Just Now!
X