परतूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या नगरपरिषदा काँग्रेसच्या ताब्यात असून, ती ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या नेतेमंडळींनी प्रयत्न चालविले आहेत.

पाच वर्षांचा अपवाद वगळला तर गेल्या २५ वर्षांत परतूर नगरपरिषदेवर सुरेशकुमार जेथलिया यांचे वैयक्तिक वर्चस्व राहात आलेले आहेत. कधी नागरी आघाडी केली, कधी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर कधी काँग्रेसचे चिन्ह घेतले. पण परतूर नगरपरिषदेवर दोन दशके आपले अधिपत्य ठेवण्यात जेथलिया यशस्वी राहिलेले आहेत. या २० वर्षांत नगराध्यक्षपदी ते किंवा त्यांच्या पत्नी विमल जेथलिया होत्या. २००४ मध्ये थेट जनतेतून झालेली नगराध्यक्षपदाची निवडणूक विमल जेथलिया यांनी जिंकली होती आणि या वेळेस पुन्हा त्या पदासाठी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. नगरपरिषदेच्या राजकारणातून विधानपरिषद आणि विधानसभा सदस्यत्वापर्यंत कार्य करणारे सुरेशकुमार जेथलिया सध्या जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…
Narendra Modi
‘चारसौ पार’चा नारा देणारे नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला घाबरले, अक्कलकोटमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल

विधानसभेच्या निवडणुकीत परतूरमध्ये जेथलिया यांचा पराभव करून विजयी झालेले बबनराव लोणीकर सध्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री आहेत. विमल जेथलिया यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी लोणीकर यांच्या पत्नी मंदाकिनी या निवडणूक लढवीत आहेत.  शिवसेनेसोबत शहर विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपने नगराध्यक्षपदासाठी पक्षाचे कमळ चिन्ह घेण्याचे टाळले आहे. मंदाकिनी लोणीकर कमळ चिन्हाऐवजी छताचा पंखा निशाणी घेऊन उभ्या आहेत.

२५ हजार ६२५ मतदार असलेल्या परतूरमध्ये जवळपास निम्मे मतदार मुस्लिम आणि दलित आहेत. त्यामुळेच भाजपने नगराध्यक्षपद निवडणुकीत पक्षाचे अधिकृत चिन्ह टाळले आहे.

जेथलिया यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी कमळ चिन्ह घेतले नसल्यामुळे लोणीकर यांना टीकेचे लक्ष्य केले. मुस्लिम मतांसाठी भाजपच्या मंत्र्यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह गोठवण्याची वेळ आली, असे नसीम खान म्हणाले.