23 September 2020

News Flash

पाचपुतेंच्या मालकीच्या साखर कारखान्यावर पंजाब नॅशनल बॅंकेची टाच, २८७ कोटी थकीत

बॅंकेच्या पुण्यातील कल्याणीनगरमधील शाखेकडून कारवाई

राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कंपनीच्या मालकीच्या साईकृपा साखर कारखान्यावर पंजाब नॅशनल बॅंकेने टाच आणली असून, त्याचा प्रतिकात्मक ताबा बॅंकेने घेतला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या पुण्यातील कल्याणीनगरमधील शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. बॅंकेनेच जाहिरातीद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.
साईकृपा साखर कारखान्याने पंजाब नॅशनल बॅंकेकडून २८७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड न करण्यात आल्यामुळे बॅंकेकडून कारखान्याला गेल्या वर्षी १७ डिसेंबरला नोटीस बजावण्यात आली होती. ६० दिवसांच्या आत कर्जाची परतफेड करण्याचे निर्देश बॅंकेकडून देण्यात आले होते. थकीत रकमेचा भरणा न केल्यामुळे बॅंकेकडून २३ मार्च रोजी कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेण्यात आला.
बॅंकेने टाच आणलेल्या मालमत्तेमध्ये नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगावमधील साईकृपा साखर कारखाना, देवदैठण आणि देवळगाव येथील कंपनीच्या जागेवरील इमारत, पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील मालमत्ता आणि हिरडगावमधील रहिवासी जमीन आणि इमारत यांचा समावेश आहे. बॅकेने दिलेल्या ताबा नोटिसीत एकूण थकीत रक्कम २८७,६०,३८,४६३ इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 6:46 pm

Web Title: babanrao pachputes sugar factory property sealed by punjab national bank
Next Stories
1 पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, ३३ वाहने भस्मसात
2 लाेकजागर : जागराची वेळ
3 फीट येण्यावरील शस्त्रक्रियांसाठी दीनानाथमध्ये स्वतंत्र विभाग
Just Now!
X