19 September 2020

News Flash

उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार….

एका व्यक्तीने थेट उद्धव ठाकरे यांनाच मेलद्वारे पत्र पाठवत मुलासाठी मदतीची विनंती केली

सध्या करोना व्हायरसमुळे देशात तिसरा लॉकडाउन घेण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेकजण घरापासून दूर अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरराज्यात गेले आणि तिथेच अडकून पडले आहेत. त्यांना राज्यात माघारी आणण्यासाठी राज्य सराकर प्रयत्न करत आहे. नोकरीसाठी चेन्नईला गेलेला ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचा एक विद्यार्थी तिथेच अडकला. मुलाची काळजी आई-वडिलांना दिवसरात्र सतावत होती. पोटचा गोळा कसा राहत असेल या चिंतेत दोघेही होते. अखेर, वडिलांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच मेलद्वारे पत्र पाठवत मुलासाठी मदतीची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ या पत्राची दखल घेत मदत केली.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहणारे मध्यमवर्गीय लोटन सोनार यांचा मुलगा चेन्नईला ट्रेनिंगसाठी गेला होता. २४ मार्च रोजी देशात लॉकडाउन घेण्यात आल्यामुळे तो तिकडेच अडकून राहिला. मग त्याला राहण्यापासून खाण्यापर्यंत अनेक अडचणी सुरू झाल्या. अखेरीस लोटन यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ संबंधित मंत्र्यांच्यासाह्याने मुलाला मदत पोहचवून राहण्याची व्यवस्था केली.

पोटच्या गोळ्याला मदत केल्यामुळे बापाने गहिवरून मुख्यमंत्रांना पुन्हा एक पत्र पाठवले. यामध्ये त्यांनी मनोभावाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद म्हटले आणि असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, अशी भावना व्यक्त केली. या ईमेलमध्ये लोटन म्हणाले की, “आसा मोहरा झाला नाही कधीही न होणार, उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार. कोटी कोटी धन्यवाद.”

(व्हायरल झालेले पत्र )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 12:26 pm

Web Title: badalapur man write latter to cm uddhav thackeray for thank you nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 Lockdown: ‘फूटपाथ स्कूल’च्या विद्यार्थ्यांचा रोजगार गमावलेल्या आई-वडिलांना मदतीचा हात
2 वर्धा : मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; जखमींना सोडून चालकासह इतर फरार
3 सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आज वेबसंवाद
Just Now!
X