मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. परंतु बारवी धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार पाणीसाठी झाल्याने आता बारवी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे काही संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत. अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बदलापूर जवळ असलेल्या बारवी धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर यासारख्या शहरांबरोबरच औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बारवी धरण भरले आहे. दरम्यान, बारवी धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार पाणीसाठी झाल्याने आता बारवी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे काही संदेश सोमवारी रात्रीपासून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि ग्रामीण भागात सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे. या संदेशांनंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती. मात्र, या अफवा असून अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याची माहिती एमआयडीसीच्या अभियंत्यांकडून देण्यात आली आहे.