News Flash

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही: हितेंद्र ठाकूर

त्यांच्या या निर्णयानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. विरारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आता आपल्या जागी कार्यकर्ते तयार होतील. तसंच लोकांची साथ यापुढेही सोडणार नाही, असं हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं. सोमवारी झालेल्या विधानसभेच्या मतदान प्रक्रियेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. पालघर जिल्ह्याच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर हे मोठं नाव आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अन्य पक्षांमा दिलासा मिळणार असला तरी त्यांनी आपण राजकारण सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसंच आगामी काळात तालुक्याच्या विकासाची राहिलेली कामं पार पाडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या अनेक वर्षांपासून वसई-विरार महानगरपालिकेतही त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे. तसंच यावर्षी वसई मतदारसंघातून हिंतेद्र ठाकूर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर नालासोपारा मतदारसंघातून आमदार क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या घोषणेपासून त्या ठिकाणी वातावरण कमालीचं तापलं होतं.

वेळीच वसईच्या गुंडांना गोळ्या घातल्या असत्या तर आज वसईकर जनता सुखी झाली असती, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे नालासोपारा येथील उमेदवार प्रदीप शर्मा यांनी जाहीर सभेत केले होते. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली होती. शर्मा यांनी केलेल्या आजवरच्या सर्व चकमकी या खोट्या होत्या. तसंच ते सुपारी घेऊनच चकमकी करत होते, हे यावरून सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया आमदार ठाकूर यांनी दिली. शर्मा यांनी आजवर केलेल्या सर्व चकमकींतील सत्य बाहेर काढणार असल्याचेही ते म्हणाले होते. तसंच प्रदीप शर्मा यांनी अनेकांना मारले, आपल्याच सहकाऱ्यांना अडकवले आणि कोटय़वधी रुपयांची माया गोळा केली. शर्मा यांची ही सर्व पापे त्यांना भोगायला लावणार, असेही ठाकूर यांनी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 3:36 pm

Web Title: bahujan vikas aghadi hitendra thakur says he wont fight election anymore vasai virar jud 87
Next Stories
1 आगामी मंत्रिमंडळात मला निश्चित स्थान मिळणार : राम शिंदे
2 Video: Exit Poll म्हणजे काय? आणि त्यांची विश्वासार्हता किती?
3 शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलेला नाही – भाजपा
Just Now!
X