News Flash

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणः आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

२०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भावे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवासात आहे. एक लाख रुपये भरल्यानंतर त्याची सुटका होणार आहे.

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिश पितळे यांच्या विभागीय खंडपीठाने सांगितलं की भावेला न्यायालयाच्या परिक्षेत्राबाहेर जाता येणार नाही. तसंच त्याला आठवडाभर रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागेल. त्याचसोबत पुढचे दोन महिने त्याला आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागणार आहे. त्यानंतर ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला दर आठवड्याला हजेरी द्यावी लागणार आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने(सीबीआय) भावेला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्याने विशेष कोर्टात जामीन अर्ज केला.मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. जामीनाच्या आदेशावर स्थगिती मिळावी ही सीबीआयची मागणी कोर्टाने नाकारली.

२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉक घेत असताना पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक केली होती. तर भावेला या दोघांना मदत केल्याप्रकरणी २०१९ मध्ये अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 1:13 pm

Web Title: bail granted to the accused vikram bhave in the case of narendra dabholkar muder vsk 98
Next Stories
1 गुन्हा रद्द करण्याच्या अनिल देशमुखांच्या मागणीला उच्च न्यायालयाची स्थगिती; कठोर कारवाईपासून सुटका नाहीच!
2 “सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबईचा गौरव; भाजपा मात्र सत्ता हलवण्याच्याच प्रयत्नात”- किशोरी पेडणेकरांची टीका
3 बॉलिवूडचे बिग बी घेऊन येत आहेत ‘केबीसी’चा नवा सीजन ; कधी होतंय रजिस्ट्रेशन सुरू ?
Just Now!
X