News Flash

शिवसेनेच्या स्वाभिमानावर फडणवीसांनी ठेवलं बोट; बाळासाहेबांचा व्हिडीओ केला ट्विट

बाळासाहेबांना जयंतीनिमित्त केलं अभिवादन

राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीमुळे भाजपाला सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे शिवसेनेनं केलेल्या राजकीय खेळीमुळे राज्यात नवं राजकारण बघायला मिळालं. मात्र, त्यामुळे शिवसेनेला भाजपाची नाराजी ओढवून घ्यावी लागली. भाजपाची ही नाराजी अजूनही कायम असल्याचं वारंवार प्रत्ययाला आलं असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतानाच शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपाची शिवसेनेवरील नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपाच्या नेत्यांकडून शिवसेनेला वेगवेगळ्या मुद्द्यावरून चिमटे काढण्यात आले. हिंदूत्वापासून ते स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यापर्यंत अनेक मुद्दे भाजपाकडून उपस्थित केले गेले आणि शिवसेनेला धारेवर धरण्याचा प्रयत्न झाल्याचंही अनेकदा दिसलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊ एका वर्षापेक्षा अधिक काळ लोटून गेला असला, तरी भाजपाची शिवसेनेवरील नाराज कमी झाली नसल्याचंच पुन्हा एकदा समोर आलं आहे.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी २०२१) साजरी केली जात आहे. यानिमित्तानं राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांची भाषणातील काही विधानं असलेला एक व्हिडीओ ट्विट करत अभिवादन केलं. मात्र, सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधानं या व्हिडीओत घेतलेली आहेत. त्यामुळे भाजपाचं सत्ता गमावण्याचं शल्य अजूनही कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून डिवचण्याचा प्रयत्नही व्हिडीओच्या माध्यमातून केल्याचं दिसत आहे.

हिंदूत्व ते सावकर… शिवसेनेवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेत आलेल्या शिवसेनेवर भाजपाकडून सतत हिंदुत्वावरून निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे. मंदिरं सुरू करण्यावरून भाजपाने शिवसेनेला हिंदुत्वाचा वारंवार हवाला दिला होता. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत असून, शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टीकाही भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा फडणवीस यांनी त्याच मुद्द्यावर बोट ठेवत शिवसेनेला चिमटा काढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 11:03 am

Web Title: balasaheb thackeray jayanti devendra fadnavis slam to shivsena uddhav thackeray bmh 90
Next Stories
1 राजकीय जुगलबंदी! ठाकरे बंधूंसह, पवार, फडणवीस आज एकाच मंचावर
2 हळवा ‘हृदयसम्राट’!
3 ठेकेदारांच्या भांडणात पालिकेला लाभ
Just Now!
X