News Flash

भविष्यात सर्वत्र काँग्रेसचा झेंडा फडकणार

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा दावा

संग्रहीत छायाचित्र

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा दावा

यवतमाळ : भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वत्र काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा दावा महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे केला. स्थानिक वादाफळे सभागृहात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

विदर्भ कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. इंदिरा गांधींचा पराभव झाला तेव्हा विदर्भामुळे महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली होती. काँग्रेसला वैभवाचे दिवस आणण्याचे काम पुन्हा विदर्भासह राज्यात करायचे आहे. नागरिकांचे कामे करण्यासाठी आपण महाविकास आघाडीत एकत्र आलो. आज यवतमाळ येथे काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाकरिता पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. काँग्रेसमध्ये सर्व नेते ताकदवर असल्याने येत्या निवडणुकीत सर्वत्र काँग्रेसचाच झेंडा राहील. मात्र त्यासाठी सर्वाना मतभेद दूर सारून एकजुटीने काम केले पाहिजे, असा सल्ला थोरात यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रात सत्तेसाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी पक्षश्रेष्ठी अनुकूल नव्हते. मात्र सामान्य लोकांची कामे करण्यासाठी आम्ही सरकारमध्ये आले पाहिजे, ही आमची भूमिका होती, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीची ताकद काय आहे हे भाजपला दाखवू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

खा. बाळू धानोरकर यांनी, विदर्भाने काँग्रेसाला भरपूर दिले आहे. विदर्भाला विसरू नका तर झुकते माप द्या, असे आवाहन काँग्रेस नेत्यांना केले. विधान परिषदेत काँग्रेसने चारपैकी दोन जागा विदर्भाला देण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. वजाहत मिर्झा यांनी केले. कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी येथील पोलीस कवायत मैदानाजवळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रस्तावित कार्यालयाचे भूमिपूजन प्रदेशाध्यक्ष, मंत्री व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 12:25 am

Web Title: balasaheb thorat attend bhumi pujan of congress district office at yavatmal zws 70
Next Stories
1 संत्र्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल
2 Coronavirus : राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
3 Coronavirus : राज्यात आज ५ हजार ३६९ नवे रुग्ण; ३ हजाराहून अधिक करोनामुक्त
Just Now!
X