काँग्रेसच्या विधीमंडळ नेते पदानंतर आता बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवल्यानंतर काँग्रेस या पदासाठी बाळासाहेब थोरात यांना संधी देणार असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागेवर काँग्रेसने त्यांचे प्रतिस्पर्धी व दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना विधीमंडळ नेते पदी निवडले होते.