News Flash

“राफेलचं सत्य जनतेसमोर यायला हवं, नाहीतर…”, बाळासाहेब थोरांताची परखड टीका

राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा म्हणून नवख्या, अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांना कंत्राट देण्यात आलं असा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारातलं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. राफेलची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवत आहे, असा सवाल बाळासाहेब थोरातांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी राफेलबद्दल सांगितलेलं सत्य आता जगासमोर येऊ लागलं आहे असंही ते आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहेत.

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “यूपीए सरकारच्या काळातच १२६ राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते. परंतु, त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे १६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला”, असं ते म्हणाले.

मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा म्हणून नवख्या, अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांना कंत्राट देण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला आहे. ते म्हणतात, “मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचं राहुल गांधींनी सांगितलं होतं. परंतु नेहमीप्रमाणे मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन हे प्रकरण गुंडाळलं”.

राफेल व्यवहारातल्या गडबडीची फ्रान्समध्ये चौकशी सुरु आहे पण भारतातच त्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न का सुरु आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. ते म्हणतात, “राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे. राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवत आहे? राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही? राहुल गांधींनी राफेलबाबत सांगितलेले सत्य आता जगासमोर येऊ लागले आहे. राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. मग भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचे काम का केले जात आहे? राफेल व्यवहार पारदर्शकपणे झाला असेल तर त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 10:27 pm

Web Title: balasaheb thorat on rafael deal says rahul gandhi is exposing the truth modi government is trying to cover it vsk 98
Next Stories
1 “शरद पवारांनी केंद्राला कोणताही सल्ला दिलेला नाही; जनतेची दिशाभूल करण्यात आली”
2 जरंडेश्वर प्रकरणानंतर भाजपा आक्रमक; अमित शाहांना दिली घोटाळा झालेल्या ३० कारखान्यांची यादी
3 Coronavirus : राज्यात दिवसभरात ९ हजार ४८९ नवीन करोनाबाधित, तर ८ हजार ३९५ रूग्ण करोनामुक्त
Just Now!
X