महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळात कोकणातील शेती बागायतींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपण पूर्वीच्या  निकषांच्यां तुलनेत दुपटीहून अधिक मदत देवू केली आहे. परंतु ही मदत तोकडी असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी माझ्या निदर्शनास आणून दिले. यावर निश्चितपणे विचार केला जाईल. असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट  केले . बाळासाहेब थोरात यांनी आज वादळग्रस्तन अलिबाग व मुरूड तालुक्याला भेट देवून नुकसानीची पाहणी केल्यावर त्यांनी काशिद येथे आढावा बठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते .

कोकणातील शतकऱ्यांची जमीन धारणा ही गुंठय़ात आहे . त्यामुळे त्यांना मिळणारी मदतदेखील तुटपुंजी आहे . शिवाय बागायतींचे नुकसान झाल्याने पुढील किमान १ वष्रे तरी उत्पन्न मिळणार नाही . त्यामुळे राज्याच्या अन्य  भागात लावले जाणारे निकष इथे लागू केल्यास ते योग्य  होणार नाही , ही बाब स्थाानिक लोकप्रतिनिधींनी माझ्या निदर्शनास आणून दिल्याचे थोरात यांनी सांगितले  वादळग्रस्त भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. वीज पुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत . लोकप्रतिनिधी मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासन अडकून पडते. ही बाब खरी असली तरी परिस्थिती पाहणे गरजेचे आहे. ज्याज्या खात्याशी संबंधित नुकसान झाले आहे. त्याच मंत्र्यांनी दौरे करून वस्तुस्थिती जाणून घेतली तर त्याबत गर नाही. असे थोरात म्हणाले .

थोरात यांनी आपल्याा दौऱ्यात नागाव, चौल, काशिद येथे वेगवेगळया ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. वादळग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या  जाणून घेतल्या.  काही वादळग्रस्ताना थोरात यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्याात आले .

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकर, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, महिला अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी शारदा पोवार आदि उपस्थित होते.

म्हणून फडणवीस फिरू शकले..

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वादळग्रस्त भागात फिरू शकले. याचा अर्थ प्रशासनाने रस्ते  मोकळे केले म्हणूनच ते फिरू शकले. मी स्वत: त्यांना टीव्हीवर लाईव्ह पाहिलं आहे. असा टोला बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. प्रशासनाचे काम दिसत नाही. असा आरोप फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात केला होता. त्यावर ते बोलत होते. लोकशाहीत विरोधी पक्षाचे जे काम आहे, ते करीत आहेत. असं ते म्हणाले .