पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांच्या गाड्या थेट क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या मुख्य स्टेडियममध्ये अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅकवरून चालवल्या गेल्या. या घटनेचे फोटो शेअर करत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शरद पवार यांच्यासह ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली.

पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. या विद्यापीठाच्या संदर्भात शुक्रवारी एक बैठक बोलावण्यात आली होती. बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठाच्या तयारीसाठी शनिवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ऑलिंपिक संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवारांसह क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे आणि क्रीडा सचिव, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त उपस्थित होते. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. मात्र, तरीही गाड्या ट्रॅकवर नेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

याच घटनेकडे लक्ष वेधत भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करून टीका केली आहे. “भारतीय धावपटू ऑलिम्पिकची तयारी करत असतानाच्या काळात ऑलम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीतील अन्य मंत्र्यांनी अंहकाराचं दर्शन घडवत आहेत. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत ट्रॅकवरून गाड्या नेण्यात आल्या, कारण त्यांना पायऱ्या चढायच्या नव्हत्या म्हणून,” असं म्हणत मालवीय यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

घटनेची चर्चा

म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आलेला आहे. स्टेडियमच्या कडेला असलेल्या दोन मजली इमारतीमध्ये स्पर्धेच्या काळात वापरण्यासाठीची दालने आहेत. पण त्यांचा क्रीडा संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ताबा घेत तेथे आलिशान कार्यालये थाटली आहेत. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. तर स्टेडियमची रचना अशी आहे, की अॅथलेटिक्सची धावपट्टी दुसऱ्या मजल्याला समांतर आहे. मंत्र्यांना लिफ्टने जाण्याचा त्रास नको म्हणून या धावपट्टीवर गाड्या आणून, त्यांना विनासायास बैठक कक्षात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असं बोललं जात आहे. इतकंच नाही, तर सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती.