वाशीम जिल्ह्य़ातील महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे चांगले काम होत आहे. या बचत गटांना बँकांनी पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार भावना गवळी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या आढावा बठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, कारंजा पंचायत समितीच्या सभापती वर्षां नेमाणे, नगराध्यक्ष अशोक हेडा, कारंजाचे नगराध्यक्ष शेषराव ढोके, मंगरूळपीरच्या नगराध्यक्ष गजाला मारुफ खान, मालेगावच्या नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश िहगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, महावितरणचे अधीक्षक अभियंता डी.आर. बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के.एम. अहमदउपस्थित होते.

Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
Bajaj Group commits Rs 5000 crore to CSR activities
कौशल्य प्रशिक्षणावर ५,००० कोटी खर्च करण्याची बजाज समूहाची घोषणा
scam in milk supply
दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप

खा. गवळी म्हणाल्या की, ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांना बँकांकडून पुरेसा पतपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्ह्य़ातील सर्व बँकांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे बचत गटाचे कर्ज मागणी प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, तसेच पात्र गटांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभा करण्यासाठी सहाय्य करावे, तसेच बेरोजगार युवकांना उद्योग, व्यवसायासाठी सहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचीही जिल्ह्य़ात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्य़ात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या कामांना गती द्यावी, या कामांवर कार्यरत मजुरांना त्यांची मजुरी वेळेवर मिळावी, यासाठी संबधित गटविकास अधिकारी यांनी खबरदारी घ्यावी, तसेच सध्या सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. सन २०१२-१३ मध्ये अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींची माहिती गट विकास अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे खचलेल्या विहिरींचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करून देण्याच्या सूचनाही खा. गवळी यांनी यावेळी दिल्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, डिजिटल इंडिया व दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचा आढावाही या बठकीत घेण्यात आला.