देशभरात लोकसभा निवडणूक पार पडली असून आता मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले आहेत. पुण्यात भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी यांच्यात लढत आहे. एकीकडे निकाल काय लागेल याची उत्सुकता असताना पुणे शहरात आधीच गिरीश बापट यांच्या नावे बॅनर झळकत असून त्यावर खासदार असा उल्लेख असल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे.

देशभरात यंदा सात टप्प्यात निवडणूक पार पडली. तर या निवडणुकीदरम्यान भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना पहावयास मिळाले. पुणे लोकसभा मतदारसंघातील लढाई भाजपा आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असल्याने सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि आघाडीकडून अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर अखेर मोहन जोशी यांना संधी देण्यात आली होती.

Confession of Chandrakant Patil says Madha is more difficult than Solapur
सोलापूर कमी कठीण, माढा जास्तच कठीण; चंद्रकांत पाटील यांची कबुली
Narayan rane with Devendra Fadnavis
नारायण राणे यांचं वक्तव्य, “देवेंद्र फडणवीस मागे लागले म्हणून भाजपात गेलो, रस्त्यावरच त्यांनी…”
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

या निवडणुकीच्या कालावधीत गिरीष बापट आणि मोहन जोशी यांनी आपणच मताधिक्याने निवडून येणार असे दावे केले. दरम्यान उद्या म्हणजेच गुरुवारी नेमकं कोण निवडून येणार हे स्पष्ट होईल. या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असताना पुण्यात एका रक्तदान शिबिराचा लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर गिरीश बापट यांचा खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्या फ्लेक्सवरून शहरातील सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे.