करोनामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक व्यवसाय आर्थिक डबघाईला गेले तर काही बुडाले देखील. त्याचा परिणाम व्यावसायिक कर्जबाजारी झाल्याने निराशेतून तरुण छोट्या व्यवसायिकांच्या आत्महत्याचे सत्र चंद्रपुर जिल्ह्यात सुरू झाले आहे. आज दुर्गापूर येथे सलूनचा व्यवसाय करणाऱ्या स्वप्नील चोधारी या २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. तीन महिन्यापासून त्याचा व्यवसाय बंद होता. विशेष म्हणजे तीन महिन्यातील ही सहावी आत्महत्या आहे.

१० दिवसापूर्वी बल्लारशाहला गैस रिपेरिंग यांनी आत्महत्या केली होती. त्यापूर्वी चंद्रपूर मध्ये एका आर्य वैश्य समाजाच्या व्यावसायिकाने आत्महत्या केली. तत्पूर्वी मूल, चिमूर, पोंभुरणा येथेही आत्महत्या केली. त्यानंतर आज ऊर्जानगर येथील समता नगर येथे एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या केली. स्वप्नील चौधरी २७ असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. शेजारी राहणाऱ्या युवकाने आज (१५ जून) सकाळी ७.३० वाजता स्वप्नील अजून उठला नाही म्हणत आवाज दिला. परंतु काहीही प्रतिसाद मिळत नाही आहे हे बघत शेजारील लोक एकत्रित झाले आणि दार उघडून बघितले असता स्वप्नील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील च्या आई-वडीलांना अगोदरच देवाज्ञा झालेली आहे तो घरी एकटाच राहत होता.