21 September 2020

News Flash

सुवर्णभोजनाच्या ताटानंतर आता काँग्रेसचा हवाई थाट!

उस्मानाबाद जिल्ह्य़ात आमदार बसवराज पाटील हे हेलिकॉप्टरने सभांच्या ठिकाणी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रमुख प्रचारक असलेल्या आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांनी सभेसाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. 

उस्मानाबाद जिल्ह्य़ात आमदार बसवराज पाटील हे हेलिकॉप्टरने सभांच्या ठिकाणी

काँग्रेसने प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवशी दिग्गज नेत्यांना निमंत्रित करून त्यांना सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटातील शाही भोजनाची मेजवानी दिल्याची घटना ताजी असतानाच आता हवाई थाटही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रमुख प्रचारक असलेल्या आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांची पन्नास किलोमीटरच्या परिघातील भरारी मंगळवारी सामान्य मतदारांनी अनुभवली. एकाच तालुक्यात चार सभा घेण्यासाठी काँग्रेसचा हवाई थाट अनेकांना चकित करून गेला. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या मुलाच्या मतदारसंघातून आमदार पाटील यांनी हेलिकॉप्टरद्वारे प्रचारसभांना सुरुवात केली आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला उमरगा हा तालुका. भौगोलिकदृष्टय़ा उस्मानाबाद जिल्ह्य़ात असला, तरी आर्थिक हितसंबंध कर्नाटक आणि सोलापूर जिल्ह्य़ाशी जोडले गेलेले. यंदा उमरगा तालुक्यातील परंपरागत सत्ताकेंद्र असलेल्या मुरुम या छोटेखानी गावातून हेलिकॉप्टरचे उड्डाण आता नित्याचे झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले आमदार बसवराज पाटील हे प्रमुख प्रचारक आहेत. पालिका निवडणुकीत देखील त्यांच्यासाठी पक्षाने विशेष हेलिकॉप्टर तनात केले होते.

तालुक्यातील प्रचारासाठी आमदार पाटील यांच्या दिमतीला पक्षाने चक्क हेलिकॉप्टर तनात केले आहे. आलूर, माकणी, तुरोरी आणि गुंजोटी या पन्नास किलोमीटरच्या परिघात मंगळवारी हेलिकॉप्टरने घिरटय़ा घातल्या

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:27 am

Web Title: basavaraj patil in osmanabad
Next Stories
1 वर्षभरात रस्ते अपघातात ३०१ जणांचा मृत्यू
2 सेनेची ताकद कमी झाल्यानेच हार्दिक पटेलची सोबत
3 आंबोली घाटात कार कोसळली, कुटुंब बचावले
Just Now!
X