01 March 2021

News Flash

भारत-पाक युद्धातील रणगाडा अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर

अलिबाग समुद्र किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या पर्यटकांना हा ऐतिहासिक रणगाडा पाहण्याची संधी

(संग्रहित छायाचित्र)

हर्षद कशाळकर

भारत -पाक युध्दात महत्वाची भुमिका बजावणारा टि- ५५ जातीचा रणगाडा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल झाला आहे. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या पर्यटकांना हा ऐतिहासिक रणगाडा पाहण्याची संधी मिळणार आहे. लवकरच या रणगाडय़ाच्या स्मारकाचे लोकार्पण केले जाणार आहे.

रायगडचे माजी जिल्हाधिकरी  डॉ. विजय सुर्यवंशी यांनी रायगडच्या  पर्यटनला चालना मिळण्यासाठी काही योजना सुरू केल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे ब्ल्यू फ्लॅग करण्याचा त्यांचा मानस होता. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर रणगाडा बसविण्याची त्यांनी योजना आखली होती. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.  डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली झाली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांच्या  प्रयत्नांतून रणगाडा उपलब्ध झाला आहे. शुक्रवारी हा  रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला आहे.

टी – ५५ टॅक हा रणगाडा १९७१ च्या भारत — पाक युद्धात वापरण्यात आला होता. प्रदिर्घ देशसेवेतून निवृत्त झालेला हा रणगाडा आता अलिबाग समुद्र किनाऱ्याची शोभा वाढविणार आहे. शुक्रवारी त्याचे अलिबागमध्ये आगमन झाले. थोडय़ाच दिवसांत सर्व नियम पाळून या रणगाडय़ाचे  लोकार्पण करण्यात येणार आहे. अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:02 am

Web Title: battlefield of the indo pak war on the shores of alibag abn 97
Next Stories
1 ‘केबीसी’ लॉटरी मिळण्याच्या लोभापायी ५ लाख रूपयांची फसवणूक
2 रायगडमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली
3 पालघरमध्ये कुष्ठरोगाचे १४० नवीन रुग्ण
Just Now!
X