News Flash

‘व्हॅलेन्टाईन डे’ला मारहाण; माढय़ात तरुणाची आत्महत्या

तरुणाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली

‘व्हॅलेन्टाईन डे’ला मारहाण; माढय़ात तरुणाची आत्महत्या
(सांकेतिक छायाचित्र)

‘व्हॅलेन्टाईन डे’चे औचित्य साधून आपल्या ओळखीच्या मुलीला घडय़ाळ भेट देण्यासाठी तिच्या गावी गेलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याने वैफल्यग्रस्त होऊन त्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील ढवळस येथे घडली. मनोज ज्योतिराम जबडे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

यासंदर्भात त्याचे वडील ज्योतिराम संपत जबडे (वय ४३, रा. ढवळस) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चरण शिंदे, रोहिदास सुरवसे (रा. निमगाव) यांच्यासह अन्य चारजणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या पूर्वसंध्येला  मनोज हा आपल्या एका ओळखीच्या मुलीला घडय़ाळ भेट देण्यासाठी निमगाव येथे गेला होता. त्याचा त्या गावात येण्याचा हेतू काही गावकऱ्यांना समजला. तेव्हा संतापलेल्या काहीजणांनी त्याला तिथेच लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली आणि त्याची बेअब्रू केली. मारहाणीत जखमी झालेल्या मनोजला पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही हल्लेखोरांनी दिली होती. त्या घटनेमुळे मनोज यास प्रचंड मन:स्ताप झाला. आपल्या गावी परत आल्यानंतर तो मानसिक तणावाखाली होता. शनिवारी सकाळी त्याने कीटकनाशक प्राशन केले.

दोन मुली बेपत्ता

मंगळवेढा तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी अचानकपणे बेपत्ता झाल्या. दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध न लागल्याने त्याबाबत पालकांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली. एका पंधरा वर्षांंच्या शालेय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी परमेश्वर शास्त्री या तरूणाविरूद्ध  तर दुसऱ्या घटनेत एका  सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी नाशिक येथील शास्त्री नावाच्या तरूणाचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:14 am

Web Title: beating valentines day young girl commits suicide abn 97
Next Stories
1 इंदुरीकर महाराजांना नोटीस
2 शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध!
3 ‘तीन पक्षांचे सरकार असल्याने निर्णय स्वातंत्र्य नाही’
Just Now!
X