नगर जिल्ह्यतील रानफुलांचे व फूलपाखरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.या सर्वेक्षणात वैशिष्टय़पूर्ण अशा पावसाळी १२२  रानफुलांची, तर फूलपाखरांच्या ३४  प्रजातींची नोंद झाली आहे.

Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Discovery of four new species of lizard from Kolhapur and Sangli districts  Nagpur
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे यश

जिल्ह्यतील जैवविविधतेचा शोध व त्याचे संगोपन व संवर्धनाच्या उद्देशाने नगर जिल्हा निसर्गप्रेमी,जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र व पर्यावरण मित्र संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पावसाळी रानफुलांचे व फूलपाखरांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदींचे संकलन दरवर्षी केले जाते.

संस्थेचे अध्यक्ष , निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या वर्षी हे जिल्हास्तरीय सर्वेक्षण ऑगस्ट ते ऑक्टोबर तीन महिन्यांच्या काळात पूर्ण करण्यात आले. अभ्यासक सचिन चव्हाण,प्रतीम ढगे, संदीप राठोड,अनमोल होन,डॉ.अशोक कराळे,अजिंक्य सुपेकर यांसह हृषीकेश परदेशी,पार्थ देवांग,नम्रता सातपुते,दीपा मव्हारे, लोटके,संजय बोकंद, दिनेश कलोसिया, मंगलाराम,अनिता ससाणे, मुकुंद दहिफळे, हृषीकेश लांडे, सुधीर दरेकर, संदीप साकुरे, शिवकुमार वाघुंबरे,संतोष शिरसागर, देवेंद्र अंबेटकर, परमेश्वर भवर आदी निरीक्षकांसह सुमारे २०५ विद्यार्थी  या उपक्रमात सहभागी झाले होते.

जिल्ह्यतील गर्भगिरी डोंगर रांगा,लहान मोठे तलाव व धरणांचा परिसर आदी निसर्गवैभवसंपन्न भागात हे सर्वेक्षण प्रामुख्याने केले जाते.जिल्ह्यतील जैवविविधता वृद्धिंगत करण्याच्या हेतूने निसर्गोपयोगी वनस्पतींच्या बियांचे जाणीवपूर्वक संकलन व रोपणही या वेळी सदस्यांमार्फत केले जाते.

या सर्वेक्षणानुसार जिल्हाभरात यावर्षी १२२ वैशिष्टय़पूर्ण पावसाळी रानफुलांची नोंद झाली असून यात  भारंगी,दुधाली,वायाटी,सोनकी,सोमवल्ली,रानजीरे,रत्नमाला,गणेशफुल, केनी, नीलवंती, घाणेरी, पंद, तिळवण, कल्प, दहाण, तेरडा, नीसुरडी, घोडेगुई, झरवड, चिमनाटी, तुंबा,सोळन आदी रानफुले मुख्यत्वे लक्षवेधी ठरत आहेत.

याबरोबरच फूलपाखरांच्या एकू ण ३४ प्रजातींची नोंद झाली असून यावर्षी ब्लु मॉरमॉन या राज्यफूलपाखराची नोंद दोन ठिकाणी झाली आहे .ही आनंदाची बाब ठरली असून यांसह टायगर, ब्लु पॅन्सी, रेड पायरट, कूपिड, लिपर्ड, जझबेल, ब्लुमून, ऑरेंज टिप,वॅडरर, इमिग्रंट आदी आकर्षक फूलपाखरांच्या नोंदीही झाल्या आहेत.या उपक्रमातील सर्व सहभागींना आकर्षक प्रमाणपत्राने सन्मानित केले जाणार आहे.

तणसदृश वनस्पतींची वाढ

लष्करी सैनिकांच्या वसतिगृहांभोवती सजावटीसाठी वापरल्या गेलेल्या टीथोनिया व कॉसमॉस सल्फ्युरिअर या रानझेंडू अथवा मेक्सिकन सूर्यफूल या मराठी नावाने ओळखल्या जाणाऱ्या परदेशी तणसदृश वनस्पतींची गेल्या तीन वर्षांत खूप अनियंत्रित वाढ झाल्याने जिल्ह्यातील स्थानिक जैवविविधता धोक्यात आल्याचेही या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. दिसायला आकर्षक परंतु पर्यावरणास घातक असलेल्या या वनस्पतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाची मदतही घेतली जाणार असल्याची माहिती निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांनी दिली.