26 February 2021

News Flash

पाचगणीतल्या टेबललँडवर १५ ते २० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

मधाचे पोळे हटवण्याची व्यापाऱ्यांची आणि पर्यटकांची मागणी

पाचगणीतल्या टेबललँड पॉईंटवर १५ ते २० पर्यटकांवर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आगे मोहळच्या मधमाशांनी हल्ला चढवला आणि दंश केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ल्याची ही पहिली वेळ नाही. तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे सुमारे ५० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला करून त्यांना दंश केला. या घटनेमुळे टेबललँडवर फिरकणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावते आहे.

मधमाश्यांच्या हल्याने पर्यटक व व्यावसायिक हादरले असून टेबललँड परिसरातील मधाचे पोळे हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मधमाश्यांच्या हल्याचा स्थानिक व्यवसायिकांवर परिणाम होत असून प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सुरक्षाविषयक उपायांचा विचार करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. पर्यटन हंगाम जवळ आल्याने अशी घटना नव्याने घडू नये यासाठी प्रशासनाने उपाय योजना कराव्यात टेबललँड पॉईंट भयमुक्त करावा. नव्याने चालू होणाऱ्या पर्यटन हंगामातील येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षा संदर्भात आवश्यक ती पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 9:11 pm

Web Title: bee attack on tourists at table land panchgani
Next Stories
1 मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, कंटेनटरने पादचाऱ्यांना चिरडलं
2 हिंदुस्थानसारख्या बलाढ्य देशाला मूठभर नक्षलवादी आव्हान देतात ही लाजिरवाणी बाब – उद्धव ठाकरे
3 मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू
Just Now!
X