बीडमधील एका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरसह कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरच फटाके फोडून, नाचतो साजसा केलेला आनंदोत्सव महागात पडला आहे. आनंदोत्सवाची क्लिप समाज माध्यमातून प्रसारित होताच पोलिसांनी संबंधित डॉक्टर अनिरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यातील, आंबेवडगाव(ता.धारूर) येथील कोरोनाग्रस्त एका रुग्णाने माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता. त्यामुळे डॉक्टरांसह सुमारे ५५ कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तीन दिवस कर्मचाऱ्यांची धाकधूक होती. गुरुवारी दुपारी हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे माजलगावकरांना दिलासा मिळाला.

मात्र दुपारी डॉ. गजानन देशपांडेंसह डॉ. श्रेयश देशपांडे व इतर कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत रसत्यावर फटाके फोडले आणि डान्सही केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. तहसिलदार आणि पोलीस निरिक्षकांनी तातडीने रुग्णालयाला भेट देत संबंधित डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे डॉक्टरांना आनंदोत्सव चांगलाच महागात पडल्याचे बोलले जात आहे.