लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह विधानसभेच्या सहा जागांसाठी मदानात उतरलेल्या विविध पक्ष व अपक्ष अशा तब्बल ११७ उमेदवारांना अनामत रक्कम वाचविता आली नाही. स्वबळाचा नारा देऊन रिंगणात उतरलेल्या शिवसेना, कांॅग्रेसला खातेही उघाडता आले नाही. पराभूत ६३ उमेदवारांच्या मतापेक्षा ‘नोटा’ची पसंती अधिक आहे, अशी साडेसहा हजार मते नोंदवली गेली.
  बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १३ उमेदवार मैदानात होते. भाजप व कांॅग्रेस उमेदवारात लढत झाली. तेरा लाख मतांपकी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडें यांनी साडेनऊ लाख मते घेतली तर कांॅग्रेसचे अशोक पाटील यांनी सव्वादोन लाख मते घेतली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एक षष्ठांश मते मिळाली तर आनामत रक्कम वाचते. त्यामुळे अत्यंत काठावर आपली अनामत वाचविण्यात अशोक पाटील यांना यश आले. पण इतर अकरा उमेदवारांना तर तीन अंकीही मतदान मिळाले नाही. हीच परिस्थिती विधानसभेच्या सहा मतदारसंघात राहिली. आघाडी व युती तुटल्याने बहुतांश ठिकाणी चौरंगी व तिरंगी लढती होतील, असे सुरुवातील वाटत होते. मात्र मतदारांनी प्रमुख दोनच पक्षाच्या उमेदवारांना निवडले.
त्यामुळे मताचे विभाजनही फारसे झाले नाही. बीड मतदारसंघातील शिवसेनेचे अनिल जगताप यांनी तीस, तर केज मधील कॉंग्रेसच्या अंजली घाडगे यानी  बावीस हजार मते घेतली. इतर मतदारसंघातील उमेदवारांना तर दोन ते तीन टक्केच मते मिळाली. राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारात सरळ सामना झाला. चार प्रमुख पक्षाचे उमेदवार मैदानात असल्याने मताचे विभाजन होईल, असे मानले जात होते. पण भाजपच्या विजयी उमेदवार गेवराईचे लक्ष्मण पवार यांनी साठ हजाराचे मताधिक्य घेतले. तर, केजच्या संगीता ठोंबरे यांनी पस्तीस हजारचे तर परळीत भाजपच्या पंकजा मुंडे यांनी सव्वीस हजाराचे मताधिक्य घेतले. बीड मध्ये जयदत्त क्षीरसागर व आष्टीत भीमराव धोंडे यांना साडेसहा हजाराच्या मताधिक्याने विजय मिळाला. कांॅग्रेस, शिवसेना, मनसे यांनी सर्व जागी उमेदवार उभे करूनही त्यांना मतदारांनी थारा दिला नाही. त्यांच्यापेक्षा नकाराधिकाराची मते अधिक आहेत.