बीड जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत गुरुवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वाखालील वैद्यनाथ लोकविकास पॅनेलने राष्ट्रवादी पुरस्कृत बॅंक्स बचाव पॅनेलचा धुव्वा उडवित एकतर्फी विजय प्राप्त केला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे गटाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना धोबीपछाड दिला.
एकूण १९ जागांपैकी १६ जागांवर वैद्यनाथ लोकविकास पॅनेलला विजय मिळाला आहे. यापैकी पाच ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली होती. राष्ट्रवादी पुरस्कृत बॅंक्स बचाव पॅनेलला केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीतील विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांची पत्नी संगीता सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक किशोर परदेशी यांनी पंकजा मुंडे यांच्या पॅनेलकडून निवडणूक लढविली होती आणि त्यामध्ये त्यांना विजय मिळाला आहे.
धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडीत आणि माजी मंत्री प्रकाश सोळंकी यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत बॅंक्स बचाव पॅनेलला केवळ तीन जागांवर विजय मिळाला. गेवराई तालुक्यातील दोन आणि माजलगावमधील एका जागेवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Rashmi Barve, Supreme Court,
रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
Vanchit, Ramtek
वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन, अपक्षाला पाठिंबा, काय आहे रामटेकचे राजकारण ?
Congress state vice president Kishore Gajbhiye filed an independent nomination form in Ramtek Lok Sabha constituency
रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी; गजभियेंचा वंचित कडून अर्ज