नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. येथे बापानेच पोटच्या अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम बापावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारुचा व्यसनी असलेल्या 35 वर्षांच्या नराधम बापाला त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वीच दोन मुली आणि एका मुलाला सोडून गेली. 12 वर्षांची पीडिता शिक्षणासोबत घरकाम देखील करायची. पण व्यसनी बाप तिला रोज मारहाण करायचा, अनेकदा त्याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. बापाच्या त्रासाला वैतागलेल्या पीडितेने याबाबत आपल्या चुलतीला सांगितलं, पण तरीही बापाकडून तिच्यावर अत्याचार सुरूच होता. अखेर सोमवारी बापाने पुन्हा एकदा अत्याचाराचा प्रयत्न केला असता तिने त्याला विरोध केला त्यामुळे संतापलेल्या बापाने पीडितेसह तिची लहान बहीण व भावाला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी ही माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यांनी तात्काळ धाव घेत आरोपीला ताब्यात घेत पीडितेची बाजू समजून घेतली. त्यानंतर पीडितेने आपल्या पित्याविरोधात रितसर फिर्याद नोंदविली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 11:59 am