26 September 2020

News Flash

बीड : सुखी संसाराचे स्वप्न भंगले, लग्नाच्या पाचव्या दिवशीच मृत्यूने कवटाळले

अन् अर्ध्यावरच डाव मोडला...

(मृत- अशोक करांडे)

लग्नाच्या आनंदावर विरजण पाडणारी एक दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच नवरदेवाचा हृदय विकाराने मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक करांडे (वय-२७) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. ते वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रहिवासी होते. अशोक हे नागपूरला एका कंपनीत नोकरीस होते. त्यांचे आई-वडील शेती करतात. एक भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. 21 मे रोजी अशोकचे लग्न माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे थाटात पार पडले होते. घरी आल्यावर हे नवदांपत्य सुखरुपरीत्या देवदर्शन घेऊन आलं होतं.

त्यानंतर रविवारी(दि.26) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बहिणीच्या मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी जात असतानाच अचानक भोवळ येऊन ते दुचाकीवरुन कोसळले. घटनेनंतर उपस्थित नागरीकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 1:32 pm

Web Title: beed incident groom dies just after five days of marriage due heart attack
Next Stories
1 ‘रामराजे बिनलग्नाची औलाद’, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य
2 मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन चालवण्यापेक्षा काँग्रेस पक्ष बरखास्त केलेला बरा – उद्धव ठाकरे
3 राज्यातील २२८ मतदारसंघांत युती आघाडीवर
Just Now!
X