News Flash

बीडचा सुपुत्र महेश तिडके पंजाबमध्ये शहीद

नववर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रासाठी दुख:द ठरला आहे.

नववर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रासाठी दुख:द ठरला आहे. बीड आणि साताऱ्यातील असे दोन जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना बीडमधील परळी तालुक्यातील लाडझरीचे जवान महेश यशवंत तिडके शहीद झाले. बुधवारी कर्तव्यावर असताना एका अपघातात महेश यांचा मृत्यू झाला.

महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच परळी तालुक्यात शोककळा पसरली. गुरूवारी महेश यशवंत तिडके यांच्या पार्थिवावर लाडझरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून शहीद महेश तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करत आपले बलिदान सदैव स्मरणात राहिल, असे म्हटले आहे.

नौशेरा येथे नवर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवाद्यांशी लढताना साताऱ्याचे जवन संदीप सावंत यांना वीरमरण आलं आहे. नौशेरा या ठिकाणी दहशतवाद्यांशी दोनहात करताना जवान संदीप सावंत शहीद झाले. ते सातारा जिल्ह्यातील मुंडे गावाचे रहिवासी होते. २५ वर्षीय संदीप सावंत यांच्यामागे त्यांची पत्नी सविता या आहेत.

नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी सज्ज झाले. दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे नेमकी संख्या समजू शकली नाही. मात्र संदीप नाईक यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप यांना वीरमरण आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 12:29 pm

Web Title: beed oarali army soldiers martyred in punjab nck 90
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही; संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल -राऊत
2 “अन्य लोक चालतात मग नाथाभाऊ का चालत नाही?”, खडसेंचा फडणवीसांना सवाल
3 पेबच्या किल्ल्यावर दारु-गांजा पार्टी, मुंबईतील ११ तरुणांना शिवभक्तांनी कपडे काढून चोपले
Just Now!
X