News Flash

बीडमधील गर्भपात प्रकरणात डॉ. शिवाजी सानप यास तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

बीड जिल्ह्यातील मुला-मुलीचे गुणोत्तर कमालीचे बिघडलेले होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. शिवाजी सानप यास न्यायालयाने गुरुवारी तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सात वर्षांपूर्वीच्या अर्भक मृत्यू प्रकरणात गर्भपात प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्या प्रकरणी जिल्हा न्या ए एस गांधी यांनी हा निकाल दिला. या काळात बीड जिल्ह्यातील मुला-मुलीचे गुणोत्तर कमालीचे बिघडलेले होते.

बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात 2011 मध्ये काही अर्भके मृत अवस्थेत आढळली होती. गर्भात स्त्री लिंगी अर्भक असेल तर गर्भपात करण्यासाठी काही दवाखाने प्रसिद्ध होते. डॉ सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्या रुग्णालयातील असे प्रकार उघडकीस आल्यानंतर काही अर्भके बिंदुसरा नदीच्या पात्रात आढळली. या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली. पोलीस यंत्रणेने तपास केला असता डॉ शिवाजी सानप यांच्या रुग्णालयातून गर्भपात झालेली अर्भक नदीपात्रात आल्याच समोर आलं.

डॉ शिवाजी सानप यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि सहकारी डॉक्टरांवर गर्भलिंग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल. प्रकरणाच्या सुनावणी जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांच्यासमोर झाली. त्यांनी सरकारी पक्षाचे 16 साक्षीदार तपासले. न्यायालयाने सानप याला दोषी ठरवत इतर आरोपींना निर्दोष ठरवले. गर्भपात प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 खाली तीन वर्षांची सक्त मजूरिची शिक्षा सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 8:25 pm

Web Title: beed shivaji sanap jailed aboration
टॅग : Beed
Next Stories
1 BLOG : साहेब फक्त ‘झेंडामंत्री’ होऊ नका ; आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांना खुलं पत्र
2 कर्जमाफीनंतरही तीन हजार शेतकरी तणावग्रस्त
3 ‘बाहेरून कार्यकर्ते घ्या आणि पक्षातली खदखद वाढवा’
Just Now!
X