News Flash

सुमित वाघमारे हत्या : मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघला अटक

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती.

बीडमधील सुमित वाघमारे हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे. भररस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पाच दिवसांनंतर पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केल्याचं समजतंय. या खूनाचा कट रचणारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी काल गजाआड केले होते, त्याला अटक केल्यानंतर तपासाला गती आली आणि पोलिसांनी आता मुख्य आरोपींना बेड्या घातल्या आहेत.

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती. गेल्या बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बीडच्या गांधीनगर परिसरामध्ये ही घटना घडली होती. मयत सुमित वाघमारे (25) हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या सुमितचं महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत प्रेम जुळले होते. दोघांच्याही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं. बुधवारी सुमित आणि भाग्यश्री हे दोघे परीक्षेसाठी महाविद्यालयात आले होते. परीक्षा संपवून दोघेही महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच बालाजी लांडगे आणि त्याचा एक साथीदार तिथे पोहोचले. दोघेही एका कारमधून आले. त्यांनी सुमितवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले आणि पळ काढला. डोळ्यादेखत पतीवर हल्ला झाल्याने भाग्यश्रीला सुरुवातीला नेमके काय घडले हेच कळले नाही. रिक्षाचालक आणि स्थानिकांच्या मदतीने तिने पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुमित-भाग्यश्रीने लग्न केल्याचा राग मनात ठेवून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने त्याची हत्या केली. लग्नानंतर भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि सुमितचा जबरदस्त वाद झाला होता. या भांडणानंतर रागाच्या भरात बालाजीने बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करत खून केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 8:38 am

Web Title: beed sumit waghmare murder case main accused balaji landage and sanket wagh arrest
Next Stories
1 निवृत्त अधिकाऱ्यांवर सरकारची भिस्त!
2 ‘त्या’ मागासवर्गीय उमेदवारांच्या नियुक्त्या होणार का?
3 ‘स्टार्टअप’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र पिछाडीवर
Just Now!
X