News Flash

बीडमध्ये सेप्टिक टँकची दुरूस्ती करताना दोघांचा मृत्यू

परळीतील साठेनगर भागात सेप्टिक टँक दुरुस्तीचे काम सुरु होते. दुरुस्ती काम करताना दोन कामगार सेप्टिक टँकमध्ये अडकले.

प्रतिकात्मक छायाचित्र

बीडमधील परळी येथील साठेनगर भागात सेप्टिक टँकमध्ये अडकून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सेप्टिक टँकची दुरुस्ती करताना ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

परळीतील साठेनगर भागात सेप्टिक टँक दुरुस्तीचे काम सुरु होते. दुरुस्ती काम करताना दोन कामगार सेप्टिक टँकमध्ये अडकले. त्यांना वाचवण्यासाठी आणखी तीन जण तिथे गेले. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. अर्जून भालेराव, विशाल लांडगे अशी या मृतांची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 10:14 am

Web Title: beed two dies while repairing septic tank in parli three injured
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
2 अपमान केला तरीही शरद पवार काँग्रेसच्याच सोबत : नरेंद्र मोदी
3 भाजपच्या प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादीची कसरत; पंकजा विरुद्ध धनंजय असाच अप्रत्यक्ष सामना
Just Now!
X