शिवप्रतिष्ठान  हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे  यांच्यासह सातजणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.

येळ्ळूरचे ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवी यात्रेनिमित्त महाराष्ट्र मैदानावर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी भिडे गुरुजी यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. तसेच माजी आमदाराला त्याची जागा दाखवून द्या, असे आवाहन केले होते.

याबाबत  संभाजी भिडे यांच्यासह मारुती परशराम कुगजी, प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास नंदी, बी. जी. पाटील, मधु पाटील, भोला पाखरे (सर्व रा. येळ्ळूर) व शिवप्रतिष्ठानचे किरण गावडे, दुद्दाप्पा बागेवाडी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवून बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे भरारी पथकाचे अधिकारी एस. बी. नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.