मराठी भाषक नगरसेवकांनी एकजुटीचा प्रत्यय देत शनिवारी बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा मराठी भाषकांचा भगवा झेंडा फडकवला. कन्नड भाषकांचे आव्हान परतवून लावत बेळगाव महापौरपदी किरण सायनाक यांची, तर उपमहापौरपदी मीना वाझ यांची निवड करण्यात आली. किरण सायनाक यांना ३२ मते पडली. तर कन्नड गटाच्या रमेश सोनटक्की यांना २६ मते मिळाली.mh02बेळगाव महापालिका महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कन्नड भाषकांनी जोरदार तयारी केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषक नगरसेवकांनी एकतेजी वज्रमूठ उगारली होती. ती अपेक्षेप्रमाणे सार्थ ठरली. आणि या निवडणुकीत मराठी भाषक उमेदवार सायनाक विजयी झाले.
मराठी भाषक गटाकडून नगरसेवक किरण सायनाक, मोहन बेलगुंदकर आणि विनायक गुंजतकर हे महापौर पदासाठी िरगणात होते. तर कानडी उर्दू गटाकडून महापौरपदासाठी दीपक जमखंडी, रमेश सोनटक्की होते. तर उपमहापौर पदासाठी मराठी गटाकडून नगरसेविका मीना वाझ, माया कडोलकर तर कानडी गटाकडून जयश्री मलगी निवडणूक लढवत होते. एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांनीही मतदानाचा
हक्क बजावला.
सायनाक व वाझ यांच्या विजयानंतर मराठी भाषकांनी जय भवानी जय शिवाजीच्या गजरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष
साजरा केला.